पहूर येथे डॉक्टर युवतीची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:43 IST2020-12-15T18:40:32+5:302020-12-15T18:43:35+5:30
संतोषीमाता नगरातील डॉक्टर युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.

पहूर येथे डॉक्टर युवतीची गळफास लावून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता. जामनेर : येथील पेठअंतर्गत असलेल्या संतोषीमाता नगरातील डॉक्टर युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. प्रतिभा श्यामराव सावळे (२३) असे या युवतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पेठ ग्रामपंचायतचे उपसरपंच श्यामराव सावळे हे आपल्या पत्नीसह नाशिक येथे गेले होते. यादरम्यान त्यांची कन्या डॉ. प्रतिभा सावळे ही एकटी घरी होती. घराशेजारीच त्यांचे लहान भाऊ रामभाऊ सावळे राहतात. दुपारच्या सुमारास रामभाऊ आपल्या भावाच्या घरात जाण्यासाठी आले. पण दरवाजा बंद दिसून आला. नंतर दुसऱ्या बाजूने घरात प्रवेश केल्यावर प्रतिभा हिने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहूल खताळ, जितेंद्र परदेशी, शशिकांत पाटील यांनी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा केला. रामभाऊ सावळे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. तिन्ही मुले डॉक्टर झालेली असल्याने उच्चशिक्षित परिवार आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही.