डी.जे.वाजविणा:या सात जणांविरुध्द गुन्हा
By Admin | Updated: April 15, 2017 16:46 IST2017-04-15T16:46:42+5:302017-04-15T16:46:42+5:30
ध्वनी प्रदुषण व सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याने सात जणांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डी.जे.वाजविणा:या सात जणांविरुध्द गुन्हा
जळगाव, 15- आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरणुकीत डी.जे.वाजवून ध्वनी प्रदुषण व सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याने सात जणांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनी पेठ पोलिसांनीही डी.जे.जप्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व पोलिसांच्या सूचनांची दखल न घेणा:याविरुध्द ही कारवाई झालेली आहे.
पोलीस कर्मचारी मनोज सुभाष पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील काशिनाथ देहडे, अशोक दोधू तायडे, दत्तात्रय भावडू तायडे, राजू कालिदास सोनवणे, हेमंत शिराळा (सर्व रा.गेंदालाल मील, जळगाव), डी.जे.ऑपरेटर योगेंद्र निकम (रा.वाडीभोकर, धुळे), चालक वासुदेव पंडीत सोनार (रा.रामानंद नगर, जळगाव) व मालक मंगेश पाटील (रा.धुळे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.