बिलखेडा येथील दिव्यांगांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:09+5:302021-09-14T04:20:09+5:30
माजी नायब तहसीलदार सातपुते यांना निवेदन सादर याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, शासन निर्णयानुसार दिव्यांग, विधवा, ...

बिलखेडा येथील दिव्यांगांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात
माजी नायब तहसीलदार सातपुते यांना निवेदन सादर
याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, शासन निर्णयानुसार दिव्यांग, विधवा, ६० वर्षांवरील व्यक्ती, आदिवासी, भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी तसेच कुष्ठरोगी, एचआयव्हीग्रस्त यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याच्या सूचना शासन निर्णयात केल्या आहेत. परंतु, अजूनही काही दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बंधू-भगिनींना या शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यांना ३५ किलो धान्य मिळत नाही. काही दिव्यांगांच्या शिधापत्रिका क प्रवर्गात आहेत. या सर्वांचा गाव पातळीवर सर्व्हे करून पात्र दिव्यांगांना नवीन सुधारित शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देऊन ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
आधीच गेल्या फेब्रुवारी २०२० पासून कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील हजारो दिव्यांग, वृद्धांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ठोस असे उत्पन्न नाही. त्यामुळे दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही दिव्यांगांची शिधापत्रिका असूनदेखील पैशाअभावी खरेदी करता आलेली नाही. इतकी हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सर्वांचा शासनाने गांभीर्याने विचार करून त्यांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका आणि ३५ किलो धान्य द्यावे. तसेच त्यांची नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत नोंद करून घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जनाआक्का बोरगाव, शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदलाल महाजन, बिलखेडा येथील गोपाळ नवल भदाणे, सचिन भदाणे, रावसाहेब भदाणे, शिवाजी भदाणे, शालिक काटे, ओंकार भदाणे, राजेंद्र काटे, नंदू भदाणे, मोहन भदाणे, देविदास बडगुजर, सोमनाथ ठाकरे, वैभव भदाणे, गौरव भदाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.