शिरसोली रस्त्यावरील दुभाजक अज्ञातांनी तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:26+5:302021-02-05T06:02:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंप समोरील रस्त्यावरचे दुभाजक अज्ञातांनी तोडल्याचा प्रकार रविवारी ...

शिरसोली रस्त्यावरील दुभाजक अज्ञातांनी तोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंप समोरील रस्त्यावरचे दुभाजक अज्ञातांनी तोडल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. तब्बल १० फुटाचे काम हातोडा किंवा जेसीबीव्दारे तोडले असल्याची शंका उपस्थित होत आहे. या दुभाजकांचे काम वर्षभरापूर्वीच झाले होते. तसेच या दुभाजकाच्या कामाच्या गुणवत्तेबाबतदेखील अनेकांकडून मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे आता दुभाजक कोणी तोडले की, वाहनांच्या धक्क्याने कोसळले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच झालेल्या प्रकाराबाबत मनपा प्रशासनाला देखील कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे.
इच्छादेवी चौक ते शिरसोली रस्त्यापर्यंत मनपाकडून २५ कोटींच्या निधीतून दुभाजकांचे काम हाती घेण्यात आले होते. मनपाच्या प्रथेनुसार हे संपूर्ण काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नव्हते. याबाबत नगरसेवक प्रशांत नाईक यांनी देखील मनपा आयुक्तांकडे या दुभाजकांच्या कामाबाबत तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, रविवारी कोसळलेले दुभाजक कोणी तोडले की, वाहनाने तोडली किंवा आपोआप कोसळले याबाबतची माहिती समोर आली नसली तरी १० फुटाचे बांधकाम पडले आहे. दुभाजक पडल्याने रस्त्यालगत खडी व सिमेंट पसरले आहे. यामुळे वाहनधारकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.