जिल्हा युवक काँग्रेसतर्फे नागरिकता संशोधन विधायकाच्या प्रतींची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 21:09 IST2019-12-11T21:09:10+5:302019-12-11T21:09:49+5:30
जळगाव - नागरिकता संशोधन विधेयक लोकसभेत ठराव करून असंविधानिक पध्दतीने पास करण्यात आले़ याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा युवक काँग्रेस ...

जिल्हा युवक काँग्रेसतर्फे नागरिकता संशोधन विधायकाच्या प्रतींची होळी
जळगाव- नागरिकता संशोधन विधेयक लोकसभेत ठराव करून असंविधानिक पध्दतीने पास करण्यात आले़ याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी सकाळी जिल्हा काँग्रेस कार्यालयाजवळ नागरिकता संशोधन विधायकांच्या प्रतींची होळी करण्यात आली.
यावेळी प्रदेश युवक सरचिटणीस मुक्तदीर देशमुख यांच्यासह शहर जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे, युवक काँग्रेस प्रदेश समन्वयक डॉ़ शोएब पटेल, शफी बागवान, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, मुजीब पटेल, नदीम काझी, दीपक सोनवणे, जाकीर बागवान, जगदीश गाढे, पी़जी़पाटील, प्रदीप सोनवणे, मनोज चौधरी, डॉ़ उमर देशमुख, डॉ़ इसरार बागवान, डॉ़ अनवर मणियार, रईस कुरेशी आदींची उपस्थिती होती.