पाचोरा येथे जि. प. कन्याशाळेत लाभार्र्थींना धनादेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:17 IST2019-01-07T15:16:30+5:302019-01-07T15:17:17+5:30

जिल्हा परिषदेच्या पाचोरा येथील कन्याशाळा क्रमांक एकमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने सावित्रीबाई दत्तक पालक योजनेंतर्गत लाभार्र्थींना धनादेशांचे वाटप करण्यात आले.

District at Pachora Par. Check allotment to beneficiaries in girl child | पाचोरा येथे जि. प. कन्याशाळेत लाभार्र्थींना धनादेश वाटप

पाचोरा येथे जि. प. कन्याशाळेत लाभार्र्थींना धनादेश वाटप

ठळक मुद्देदत्तक पालक योजनेंतर्गत लाभार्र्थींना मिळाला लाभशाळेतील वातावरण, स्वच्छता, रंगरंगोटी पाहून मान्यवर प्रभावित

पाचोरा, जि.जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाचोरा येथील कन्याशाळा क्रमांक एकमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने सावित्रीबाई दत्तक पालक योजनेंतर्गत लाभार्र्थींना धनादेशांचे वाटप करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
सर्व मान्यवरांच्या हस्ते भातखंडे केंद्रातील लाभार्थी मुलींना धनादेशांचे वाटप करण्यात आले. शाळेने केलेले आनंददायी वातावरण, स्वच्छता, आकर्षक रंगरंगोटी, डिजीटल शाळा यामुळे प्रभावित झालो असल्याचे मत केशव पातोंड यांनी व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती देऊन त्यांच्यामुळेच सर्व महिलावर्गाला न्याय मिळाला व मिळत असल्याचे सांगितले.
गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनीसुद्धा स्त्री शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी समाधान पाटील, केंद्रप्रमुख सुधाकर पाटील उपस्थित होते. स्वागतगीत आशा राजपूत यांनी, तर सूत्रसंचालन मीना हिवरे यांनी केले. आभार मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक डॉ.वाल्मीक आहिरे, मंगला वाणी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: District at Pachora Par. Check allotment to beneficiaries in girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.