जिल्हा बँक लवकरच एटीएम सुरु करणार
By Admin | Updated: September 20, 2015 01:17 IST2015-09-20T01:17:37+5:302015-09-20T01:17:37+5:30
सर्वसाधारण सभेत निर्णय : मागेल त्या शेतक:याला बागायती कर्ज देणार; ठेवीदारांना रु-पे कार्ड

जिल्हा बँक लवकरच एटीएम सुरु करणार
जळगाव : जिल्हा बँकेचा एकही सभासद, शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेककडे वळू नये यासाठी जिल्हा बँकही सहा महिन्यांमध्ये कोअर बँकींगचे काम पूर्ण करेल, एटीएम यंत्रणा, रु-पे कार्ड जिल्हा बँकेच्या सभासद शेतक:यांना दिले जातील, अशी घोषणा जिल्हा बँकेच्या सभेत चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर यांनी केली. बँकेच्या सभागृहात 99 वी सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर होत्या. संचालक महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे, प्रा.चंद्रकांत सोनवणे, संजय सावकारे, माजी आमदार चिमणराव पाटील, राजीव देशमुख, अॅड.रवींद्र पाटील, संजय पवार, नानासाहेब देशमुख, डॉ.सुरेश पाटील, गणेश नेहेते, नंदू महाजन, वाडीलाल राठोड, तिलोत्तमा पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व्यासपीठावर होते. बँकेला ‘ब’ दर्जा व रिझव्र्ह बँकेचा परवाना 2014-15 च्या ऑडीटमध्ये बँकेला ब दर्जा मिळाला आहे. तसेच रिझव्र्ह बँकेने बँकेला व्यवसायाचा परवाना दिल्याची माहिती अध्यक्ष खडसे खेवलकर यांनी दिली. सहा महिन्यात कोअर बँकींग जिल्हा बँक येत्या सहा महिन्यात कोअर बँकींगची सेवा सुरू करेल. त्याबाबत कार्यवाही सुरू असून, 100 शाखा संगणकीकृत झाल्याची माहिती देण्यात आली. सात आर्थिक साक्षरता केंद्र गुंतवणूक, विविध योजना, बँकेची धोरणे याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाभरात सात तालुक्यांमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र सुरू केले जातील, अशी माहिती खडसे खेवलकर यांनी दिली. बँकेचा इतिहास जतन करणार जिल्हा बँकेचा इतिहास, जुनी कागदपत्रे व इतर माहितीचे जतन व्हावे, ती सहज मिळावी यासाठी डॉक्युमेंट मॅनेजमेंट कार्यक्रम हाती घेतला जाईल, असा निर्णय झाला. जिल्हा बँकेच्या ठेवीदारासाठी जगभरात व्यवस्था जिल्हा बँकेच्या ठेवीदाराला, सभासदाला जगात कुठेही व्यवहार करता यावा, कुठेही पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी 24 तास बँकींगवर भर दिला जाईल. त्या अंतर्गत केंद्र सरकारच्या मदतीने रु-पे कार्ड ठेवीदार, सभासद, शेतक:यांना दिले जातील. तसेच आगामी काळात प्रत्येक तालुका, मोठय़ा बाजारपेठेचे ठिकाण आदी ठिकाणी टप्प्याटप्प्याने एटीएम सुरू केले जातील. तसेच ऑनलाईन बँकींगसाठी नाबार्डकडून मदत घेतली जाईल, अशी माहिती अध्यक्षांनी दिली. महसूलमंत्र्यांनी दिल्या जिल्हा बँकेला सूचना आणि सल्ला महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेविषयी आपली भूमिका मांडली तसेच काही सूचना दिल्या. त्यात जिल्हा बँकेने शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम घ्यावेत, सहकारी संस्थांसाठी एक जिल्हा प्रशिक्षण मेळावा बाबुराव देशमुख यांच्या मदतीने घेतला जावा, नफा कमी झाला तरी चालेल, पण संचित तोटा प्रथम कमी व्हायला हवा, जिल्हा बँकेचा एनपीए पाच टक्क्यांखाली यायला हवा, जिल्हा बँकेने बागायती पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जाबाबत 100 टक्के वसुली असलेल्या संस्थांना कर्ज देण्यासाठी धोरण बदलावे, 100 टक्के वसुली असलेल्या संस्थेसाठी मागेल त्याला बागायती कर्ज ही भूमिका, असावी, असेही सांगितले. यानुसार जिल्हा बँकेने 100 टक्के वसुली असलेल्या संस्थांसाठी मागेल त्याला बागायती कर्ज देण्याचे जाहीर केले. पगारदार संस्थांना कर्ज हवे असले तर त्यांच्याकडे 30 लाख खेळते भांडवल आहे का याची तपासणी होते, असे अशोक खलाणे म्हणाले. बागायती कर्ज बंद केल्यावरून संताप जिल्हा बँकेने मध्यम मुदतीचे व बागायती कर्ज बंद केल्यावरून मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी कमलाकर पाटील यांनी संताप व्यक्त केला. हे कर्ज सुरू करावे. चोपडा, यावल, रावेर भागात टिश्यू रोपांची लागवड अधिक असते, पण याच भागात टिश्यू केळी रोपांचे कर्ज कमी दिले आहे. इतर भागात रोपांचे कर्ज अधिक आहे. त्याची चौकशी करा, पण ज्या संस्था 100 टक्के वसुली देतात त्यांना बागायती कर्ज द्यावे, अशी मागणी त्यांनी दिली. सभागृह वातानुकूलित करा जिल्हा बॅँकेचे सभागृह वातानुकूलित करावे, अशी मागणी संचालक संजय पवार यांनी सभागृहात केली. ती महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी मान्य केली. नंतर या बॅँकेच्या सभागृहाच्या नूतनीकरणाबाबत विविध प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली. बेलगंगाच्या सभासदांबाबत कारवाई केली का? बेलगागा साखर कारखान्याचे 71 कोटींवर कर्ज निर्लेखीत केले जात आहे. पण हे कर्ज बुडविण्यास कारणीभूत बाबी तपासल्या का, संस्था बंद पडली म्हणून तत्कालीन संचालकांवर कारवाई केली का?याची विचारणा सभासदांनी केली. त्यासंदर्भात कार्यकारी संचालकांनी ब वर्ग संस्थांना थकीत कर्ज निर्लेखनाचे अधिकार असतात, असे स्पष्टीकरण दिले. पिंपळगाव हरेश्वरच्या शाखेत अपूर्ण कर्मचारी आहेत. ठेवीदारांना त्रास होतो, अशी तक्रारही सभेत एका सभासदाने केली. 250 कर्मचा:यांची भरती पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेत कर्मचारी कमी आहेत. 500 कर्मचा:यांची भरती करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पैकी 250 कर्मचा:यांच्या भरतीला लवकरच सुरूवात होईल, अशी माहिती अध्यक्षांनी दिली. बँकेचे सभागृह पीपीपी तत्वाने चालविण्यास देणार जिल्हा बँकेची स्थिती नाजूक असल्याने बँक तूर्ततरी मुख्यालयातील सभागृहाची दुरुस्ती करू शकत नाही. यामुळे हे सभागृह दोन संस्थांनी नूतनीकरण करून चालविण्यासंबंधी प्रस्ताव दिला आहे. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्वाने हे सभागृह बँकेचा एक पैसाही खर्च न करता काही कालावधीसाठी संबंधित संस्थेकडून दुरुस्त करून घेऊन नंतर बँकेकडे येईल, असा आयत्या वेळचा विषय आला. त्यास मंजुरी देण्यात आली. कमी टक्के भागभांडवल कपातीचे अधिकार मिळावेत एका सभासदाचे 20 हजार रुपयांपेक्षा अधिक भागभांडवल घेऊ नये, असा नियम असल्याने पाच ते तीन लाखांर्पयत कर्ज देताना तीन किंवा यापेक्षा कमी टक्के भागभांडवल कपातीचे अधिकार मिळावेत अशी मागणी केली.