गुढे येथे शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST2021-08-25T04:21:53+5:302021-08-25T04:21:53+5:30
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप गंगाराम माळी होते. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना स्माईल प्लीज फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शालेय ...

गुढे येथे शालेय साहित्य वाटप
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप गंगाराम माळी होते. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना स्माईल प्लीज फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. यावर्षीदेखील विद्यार्थ्यांना दिलीप माळी तसेच स्माईल प्लीज फाउंडेशनचे सदस्य यांच्या हस्ते वह्या, पेन, पाटी, पुस्तक, पेन्सिल, दप्तर अशा साहित्याचं वाटप करण्यात आले. यावेळी आनंदा महाजन, दीपक पाटील, गंगाराम माळी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे विजय माळी, योगेश माळी, दीपक पाटील, नीलेश चौधरी, जितेंद्र चौधरी, भरत शिंदे, नाना शिंदे, बापू सोनार, मुख्याध्यापक माधव वाघ, शिक्षक सुदाम पाटील, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक माधव वाघ यांनी केले. आभार शिक्षक सुदाम पाटील यांनी मानले.
240821\img_20210824_132801.jpg
गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना स्माईल प्लीज फाउंडेशन चे सदस्य