शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात ९५० सनदांचे वाटप, मोहिमेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 21:08 IST

भूषण श्रीखंडे/ जळगाव : महास्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरुवात झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील ...

भूषण श्रीखंडे/जळगाव: महास्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरुवात झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सनद वाटप करून मोहिमेला सुरुवात झाली. दोन दिवसात जिल्ह्यात गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून यातून ३ लाख ९५ हजार रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कलाबाई चिंतामण कोळी, कमलबाई रमेश गायकवाड व शिवलाल गिरमा सोनवणे या शेतकऱ्यांना सनद वाटप करून मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाने जिल्ह्यात सनद वाटप मोहीम राबविली. स्वामीत्व योजनेंतर्गत गावठाण सर्व्हे झालेल्या जळगाव जिल्ह्यातील गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून ३ लाख ९५ हजार २८८ रुपयांची सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.

जीआयएस प्रणालीवर मालमत्ता पत्र तयार केले जाणार

स्वामित्व योजनेत जळगाव जिल्हयातील सर्व गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येत आहे. प्रथम टप्प्यातील सर्वेक्षणातून नागरिकांना सनद वाटप केली जात असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम. पी. मगर यांनी दिली.

या तालुक्यांमध्ये सनद वाटपरावेर तालुक्यातील मौजे पिंपरी, पाडले खु., निरूळ, पाडले बु., नेहते, बोरखेडा, मोरगांव खु, चोरवड, कोळोदे, मांगी या गावात ३२९ सनदचे वाटप १ लाख ५२ हजार ४३३ रुपये सनद फी वसूल झाली. जळगाव तालुक्यातील मौजे देवगाव, मोहाडी, खेडी खु, पळसोद, वसंतवाडी, आवार, गाढोदे, आमोदे बु, या गावात २४८ सनद वाटप व ९७ हजार ८० रुपये सनद फी वसूल, पारोळा तालुक्यातील मौजे सोके, हिरापूर, सावखेडे तुर्क, कन्हेरे, मेहु, नेरपाट, सावखेडे होळ, चहुत्रे खोलसर, बाहुटे, या गावांमध्ये २२६ सनद वाटप व ८७ हजार २६० रुपये सनद फी वसूल, यावल तालुक्यातील मौजे पथराळे, हरिपुरा, करंजी, भोरटेक, भालशिव, पिंपरी, गिरडगाव, भालशिव या गावात ११२ सनद वाटप आणि ४३ हजार ५७० रुपये सनद फी वसूल झाली. पाचोरा तालुक्यातील मौजे हडसन, कोकडी, वडगाव जोगे, वडगाव आंबे खु, या गावात ३५ सनद वाटप व १४ हजार ९४५ रुपये सनद फी वसूल झाली आहे.

 

 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलJalgaonजळगाव