रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अवाॅर्डचेे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:55+5:302021-09-10T04:21:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ शिक्षकांना ...

रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अवाॅर्डचेे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवाॅर्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यास प्रांतपाल रमेश मेहेर, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, अध्यक्ष उमंग मेहता, माजी मानद सचिव सुनील आडवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोहळ्यात सुचिता बाविस्कर (मनपा शा. क्र. ३८ जळगाव), सुनीता शिमाले (क्रीडा रसिक सोसा. संचालित प्राथ. शाळा), जयश्री पाटील (चांदसरकर प्राथ. शाळा), अनिल शितोळे (नूतन मराठा माध्य. विद्यालय), किरण चौधरी (भगीरथ माध्य. विद्यालय), नरेंद्र वारके (क. रा. वाणी बाल निकेतन), मनोहर तेजवाणी (आदर्श सिंधी माध्य. विद्यालय), सागर झांबरे (शारदा प्राथ. शाळा सुप्रीम कॉलनी), राजेंद्र साहेबराव पाटील (शिक्षण शास्त्र विद्यालय, नूतन कॉलेज प्रांगण) या नऊ शिक्षकांना पुरस्कार, शाल, श्रीफळ प्रदान करून कुटुंबीयासह सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रांतपाल मेहेर आणि राजीव शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अशोक सौंदाणे यांनी, तर परिचय चंदर तेजवानी यांनी करून दिली. आभार नंदू आडवाणी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी गोल्डसिटीचे प्रोग्रॅम कमेटी चेअरमन यश रावलानी, लिट्रसी कमेटी चेअरमन दिनेश राठी, व्होकेशनल कमेटी चेअरमन माजी अध्यक्ष प्रखर मेहता, माजी अध्यक्ष नीलेश जैन यांनी परिश्रम घेतले.