भडगाव येथे दिव्यांगांना साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 18:13 IST2019-01-06T18:10:19+5:302019-01-06T18:13:26+5:30
भडगाव येथील पंचायत समिती गटसाधन केंद्र शिक्षण विभागामार्फत विशेष गरजा असणाºया तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

भडगाव येथे दिव्यांगांना साहित्य वाटप
भडगाव, जि.जळगाव : येथील पंचायत समिती गटसाधन केंद्र शिक्षण विभागामार्फत विशेष गरजा असणाºया तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद झळकत होता.
हा कार्यक्रम भडगाव पंचायत समिती गटसाधन केंद्राजवळ ४ रोजी पंचायत समिती पदाधिकारी, कर्मचारी, नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पंचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, पंचायत समिती सदस्य रावण भिल्ल, संजय पाटील, विजय पाटील, गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील यासह पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे कर्मचारी, पालक, नागरिक उपस्थित होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना पदाधिकाºयांच्या उपस्थितीत एक ट्रायसिकल, दोन सीपी चेअर, तीन कर्णयंत्र, तीन एम आर कीट, दोन रोलेटर व इतर दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपकामी निंबा परदेशी, सचिन पाटील, छाया महाजन, भगवान ढाके, प्रकाश पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी सहकार्य केले.