श्रीरामचंद्र संघटनातर्फे पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:05+5:302021-08-22T04:19:05+5:30

जामनेर तालुक्यातील भागात एकीकडे पावसाची प्रतीक्षा लागून होती, तर दुसरीकडे कोकण, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाने अक्षरशः हाहाकार ...

Distribution of food grains to flood victims by Shri Ramchandra Sangh | श्रीरामचंद्र संघटनातर्फे पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य वाटप

श्रीरामचंद्र संघटनातर्फे पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य वाटप

जामनेर तालुक्यातील भागात एकीकडे पावसाची प्रतीक्षा लागून होती, तर दुसरीकडे कोकण, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाने अक्षरशः हाहाकार माजविला होता. या पावसामुळे अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेकजण बेघर झाले आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी माणुसकीच्या नात्याने पूरग्रस्तांसाठी विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून अन्नधान्य पुरविण्यात येत आहे.

येथील श्रीरामचंद्र संघटनेच्या युवकांनी जमा केलेले अन्नधान्य पूरग्रस्तांसाठी स्वतः जाऊन गरजू लोकांना वाटप केले. यावेळी श्रीरामचंद्र संघटनेचे अध्यक्ष जसवंत राजपूत, उपाध्यक्ष-लोकेश करवंदे, सचिव ह.भ.प. ईश्वर महाराज पाटील, कैलास राजपूत, नाना माळी, जयवंत माळी, राहुल माळी, हरी माळी, गुणवंत माळी, गोलू अपार, विशाल माळी, रवींद्र जाधव, किरण सुरवाडे, पवन राजपूत, हितेश राजपूत उपस्थित होते.

210821\fb_img_1629357220423.jpg

पाळधी येथील श्रीरामचंद्र संघटनेच्या तरुणांनी पूरग्रस्तांना मदत करताना

Web Title: Distribution of food grains to flood victims by Shri Ramchandra Sangh