फैजपुरात शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 15:51 IST2019-10-09T15:50:39+5:302019-10-09T15:51:50+5:30
अमन एज्युकेशनल अॅण्ड वेल्फेअर सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

फैजपुरात शैक्षणिक साहित्य वाटप
ठळक मुद्देअमन एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीचा उपक्रमजि.प. उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंद
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील अमन एज्युकेशनल अॅण्ड वेल्फेअर सोसायटी (बजमे अमन) तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा क्रमांक एकमधील तिसरीच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक नईम यांच्या हस्ते वह्या, पेन आदी वस्तूंचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना बजमे अमन संस्थेचे अध्यक्ष काजी जावीद अहेमद म्हणाले की, संस्थेतर्फे अजूनही शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे नियोजन आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष शरीफ नवाज, खजिनदार शाहिदा बी, सचिव काजी असीर अहेमद, सहसचिव फिरोज खान, सदस्य शेख आसिफ व मोहसीन खान यांनी मार्गदर्शन केले.