जामनेरला ५३ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 17:54 IST2019-02-01T17:53:45+5:302019-02-01T17:54:03+5:30

प्रधानमंत्री आवास योजना

Distribution of checks to Jamnar 53 beneficiaries | जामनेरला ५३ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

जामनेरला ५३ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

जामनेर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील पात्र ५३ लाभार्थ्यांना शुक्रवारी सकाळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते प्रत्येकी ४० हजार रुपये अनुदानाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. महाजन यांच्या निवासस्थानी हा धनादेश वितरणाचा कार्यक्रम झाला.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील सुमारे २ हजार २०० नागरिकांना घर बांधून देण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी ५० लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले आहे. यावेळी बांधकाम सभापती महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे , नगरसेवक जितू पाटील, नाजिम शेख, रिजवान शेख, उपनगराध्यक्ष अनीस शेख, अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, प्रा. शरद पाटील, खलील खान, पुखराज डांगी, दत्तात्रय सोनवणे, सी.एन.खर्चे, प्रकाश माळी, नरेंद्र पाटील, नुरमोहम्मद शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of checks to Jamnar 53 beneficiaries

टॅग्स :Jalgaonजळगाव