सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे अंधबांधवाना  ब्लॅंकेट वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 02:36 PM2021-02-04T14:36:08+5:302021-02-04T14:36:26+5:30

अंजाळे येथे सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे अंधबांधवाना  ब्लॅंकेट वाटप करण्यात आल्या.

Distribution of blankets to blind people by Sakhi Shravani Mahila Multipurpose Organization | सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे अंधबांधवाना  ब्लॅंकेट वाटप 

सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे अंधबांधवाना  ब्लॅंकेट वाटप 

googlenewsNext

भुसावळ :    येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मंगळवारी यावल तालुक्यातील अंजाळे येथील खान्देश अंधकल्याण संघ  संचालित स्नेहदीप निराधर अंध महिला आश्रमातील अंधबांधवाना व महिलांना ब्लॅंकेट व साड्या वाटप करण्यात आल्या. सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे अध्यक्षस्थानी  राजश्री नेवे होत्या. 
    प्रमुख पाहुणे म्हणून महिला पतंजली राज्य कार्यकारणी सदस्या महानंदा पाटील, महिला मुक्ति मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संगीता भामरे,  उज्वला बागुल, रूही बेंडाळे, मंदाकिनी केदारे आदी उपस्थित होते.  अंधबांधव  संजय पाटील यांच्या गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या स्तुत्य  कार्याचे कौतुक केले.
थंडीपासून बचाव व्हावा म्हणून उबदार  ब्लॅंकेट मान्यवर  व संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते अंध बांधव व महिलांना  देण्यात आले. तसेच महिलांना साड्याही वाटप करण्यात आल्या.  
  कार्यक्रमास रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी देशमुख यांच्यासह  माया चौधरी, भाग्यश्री नेवे, स्मिता माहुरकर, अंकिता राणे, संगीता लुल्ला यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.

Web Title: Distribution of blankets to blind people by Sakhi Shravani Mahila Multipurpose Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.