चाळीसगावात पोलिसांतर्फे मदत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:53 IST2020-03-30T16:52:42+5:302020-03-30T16:53:50+5:30
पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व पोलीस बांधवांच्या एक दिवसाच्या पगारातून जमा झालेल्या पैशातून खाद्य वस्तूंचे वाटप पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

चाळीसगावात पोलिसांतर्फे मदत वाटप
ठळक मुद्देपोलिसांच्या एक दिवसाच्या पगारातून मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबियांना खाद्य वस्तूंचे वाटपगोरगरिबांनी दिल्या दुवा
चाळीसगाव, जि.जळगाव : पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व पोलीस बांधवांच्या एक दिवसाच्या पगारातून जमा झालेल्या पैशातून शहरातील हातावर मोलमजुरी करणारे १२१ कुटुंबियांना १९ अत्यावश्यक खाद्य वस्तूंचे वाटप पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
संचारबंदी लागू असल्याने या अन्न पदार्थांचे पॅकेज प्रत्येक गरीब कुटुंबाच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे कामदेखील पोलिसांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सहायक पोलीस निरीक्षक योगेश भामरे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांच्या या मानवतावादी उपक्रमाबद्दल गोरगरिबांनी समाधान व्यक्त केले.