पोलीस दलाला मास्क वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST2021-05-22T04:16:18+5:302021-05-22T04:16:18+5:30

================== पोलिसांनी घेतली प्रतिज्ञा जळगाव : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त पोलीस दलातर्फे प्रतिज्ञाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी ...

Distribute masks to the police force | पोलीस दलाला मास्क वाटप

पोलीस दलाला मास्क वाटप

==================

पोलिसांनी घेतली प्रतिज्ञा

जळगाव : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त पोलीस दलातर्फे प्रतिज्ञाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी पोलीस अधिका-यांसह पोलीस कर्मचा-यांनी दहशतवाद व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांची उपस्थिती होती.

================

एक दिवसाची पोलीस कोठडी

जळगाव : हळदीच्या कार्यक्रमात गावठी पिस्तोल घेवून नाचणा-या युनूस सलीम पटेल (३०,रा. गेंदलाल मिल) या तरूणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला गुरूवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी शहर पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. दरम्यान, उमरठी येथून गावठी पिस्तोल आणल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुढील तपास विजय निकुंभ करीत आहेत.

=================

Web Title: Distribute masks to the police force