कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थींना धनादेश वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:43+5:302021-07-04T04:11:43+5:30

अमळनेर : विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या रत्नापिंप्री, कोळपिंप्री, भिलाली, आंबापिंप्री (ता. पारोळा) येथील ५ कुटुंबांच्या वारसांना कुटुंब लाभ योजनेतील ...

Distribute checks to the beneficiaries of the family benefit scheme | कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थींना धनादेश वितरित

कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थींना धनादेश वितरित

अमळनेर : विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या रत्नापिंप्री, कोळपिंप्री, भिलाली, आंबापिंप्री (ता. पारोळा) येथील ५ कुटुंबांच्या वारसांना कुटुंब लाभ योजनेतील मंजूर रकमेचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.

यावेळी तहसीलदार अनिल गवांदे उपस्थित होते.

यात धोंडू पाटील यांच्या पत्नी उषाबाई धोंडू पाटील (रत्नापिंप्री), सुधाकर वडर यांच्या पत्नी मीराबाई वडर (कोळपिंप्री), अरुण शिंदे यांच्या पत्नी सारिका शिंदे (कोळपिंप्री), विष्णू पाटील यांच्या पत्नी सुवर्णा पाटील (भिलाली), निंबा माळी यांच्या पत्नी वैशाली माळी (आंबपिंप्री) या कुटुंबातील लाभार्थी वारसांना शासनाच्या योजनेनुसार प्रत्येकी २० हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

यावेळी जि. प. सदस्य हिंमत पाटील, पं. स. सदस्य अमोल पाटील, द. सबगव्हाणचे सरपंच नंदलाल पाटील, रत्नापिंप्रीचे उपसरपंच अंकुश भागवत, सुनील काटे, योगेश रोकडे, लोकेश पवार, राहुल पवार, प्रदीप राजपूत आदी पदाधिकारी, तर नायब तहसीलदार राकेश शिंदे, अनिल परदेशी, गणेश नाईक, भिलासे भाऊसाहेब आदी शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Distribute checks to the beneficiaries of the family benefit scheme