जि. प. शाळा मुख्याध्यापकाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:17+5:302021-09-16T04:22:17+5:30
यावल : टेंभी कुरण येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विशाल बाबूराव गवळी (वय ३६, रा. स्वामी समर्थ नगर यावल, ...

जि. प. शाळा मुख्याध्यापकाची
यावल : टेंभी कुरण येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विशाल बाबूराव गवळी (वय ३६, रा. स्वामी समर्थ नगर यावल, मूळ रा. दहीवद, ता. शिरपूर) यांनी राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
विशाल गवळी हे टेंभी कुरण येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते जेवण करून रात्री झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीला आला. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केले. लखीचंद पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.
गवळी यांची पत्नी महिन्यापूर्वी बाळंतपणासाठी माहेरी गेल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांनी यावल गाठले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि एक महिन्याची मुलगी, सात वर्षांचा मुलगा आहे.