कोऱ्हाळा ग्रा.पं.त सदस्यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:30+5:302021-09-09T04:21:30+5:30
कोऱ्हाळा गावात ग्रामपंचायतीने गावाच्या सुविधेसाठी खरेदी केलेल्या ३८,५०० रुपये कलोरिंग डोस मशीन गावात कुठेही आढळून येत नाही, ...

कोऱ्हाळा ग्रा.पं.त सदस्यांची नाराजी
कोऱ्हाळा गावात ग्रामपंचायतीने गावाच्या सुविधेसाठी खरेदी केलेल्या ३८,५०० रुपये कलोरिंग डोस मशीन गावात कुठेही आढळून येत नाही, तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी ९० हजार रुपये खर्च करून खरेदी केलेली टीसीएल पावडर गेली कुठे? पाणीपुरवठा दुरुस्तीवर ८४ हजार ९६३ रुपये खर्च करूनही गावात पाइपलाइन फुटलेल्या अवस्थेत का आहेत, तसेच ग्रामपंचायत वॉल कंपाउंडसाठी आलेला दोन लाख रुपये निधी ग्रामीण रोजगार हमी योजना खात्यात का वर्ग केला आणि खरंच वर्ग केला आहे किंवा नाही, या चारही कामांच्या चौकशीसाठी संतोष त्र्यंबक कोळी व दुर्गा धनराज कांडेलकर या दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना तक्रार अर्ज दिलेला आहे.
मात्र, तक्रारी अर्ज देऊनही गेल्या काही दिवसांपासून अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने, पंचायतीच्या या गैरकारभाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा, दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांच्या सह्यांनिशी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.