जळगावात अतिक्रमण काढताना वाद, कारवाई थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:40 IST2019-06-04T12:40:01+5:302019-06-04T12:40:25+5:30
महापौरांची भेट

जळगावात अतिक्रमण काढताना वाद, कारवाई थांबविली
जळगाव : शहरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण काढत असताना त्यास विरोध होऊन वाद झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी झाला. त्यामुळे ही कारवाई थांबविण्यात आली.
एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी मंगळवारी सकाळी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक त्या ठिकाणी पोहचले. कारवाई सुरू होताच त्यास विरोध होऊ लागला व त्यातून वाद उद््भवला. त्यानंतर तेथे महापौर सीमा भोळे पोहचल्या. त्यांनी ही कारवाई थांबविण्याच्या सूचना दिल्या. आता पावसाळा होईपर्यंत अतिक्रमण काढले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. या भागातील रहिवासी मनपा आयुक्त उदय टेकाळे यांच्या भेटीसाठी मनपात गेले.