Disease on banana plants in Ghusardi Shivar in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यातील घुसर्डी शिवारात केळी रोपांवर रोग
भडगाव तालुक्यातील घुसर्डी शिवारात केळी रोपांवर रोग

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कृषी विभागास निवेदनपंचनामाकडे दुर्लक्ष शेतकरी संतप्त

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील घुसर्डी शिवारात केळीच्या रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी कृषी विभागास दिले आहे.
अनेक शेतकºयांनी टिश्यू केळीचा रोपांची लागवड केलेली होती. या केळीच्या रोपांवर रोगाच्या प्रादुर्भावाने रोपांचे नुकसान झाले आहे. या पिकाची पाहणी करून तत्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांना दिल आहे.
निवेदनाच्या प्रति तालुका कृषी अधिकारी बी.बी.गोरडे, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. मात्र कृषी व महसूल प्रशासनाने अद्यापही पीक नुकसानीचा पंचनामा केलेला नाही. त्यामुळे संबंधितांविषयी शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
निवेदवावर शिवसिंग परदेशी, ओंकार परदेशी, शांताबाई परदेशी, किरण परदेशी, कमलबाई परदेशी, कपूरचंद परदेशी, रेखाबाई परदेशी, गोविंद परदेशी, भगवान परदेशी, अमरसिंग परदेशी, जगदीश परदेशी, नीताबाई परदेशी, सुभाष परदेशी, महादूसिंग परदेशी, योगेश परदेशी, रायचंद परदेशी, प्रकाश परदेशी यांच्यासह २० शेतकºयांच्या सह्या आहेत.


Web Title: Disease on banana plants in Ghusardi Shivar in Bhadgaon taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.