‘त्या’ नागरिकांच्या जागा उताऱ्यासाठी समस्यांच्या पाढ्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST2021-06-23T04:12:12+5:302021-06-23T04:12:12+5:30

चाळीसगाव : शहरातील चौधरीवाडा, जहागीरदारवाडी व शहराच्या अनेक भागात परंपरागत पन्नास वर्षांच्या जुन्या जागांवर नागरिकांचा रहिवास असून, गावठाण ...

Discussion on the issue of displacement of 'those' citizens | ‘त्या’ नागरिकांच्या जागा उताऱ्यासाठी समस्यांच्या पाढ्यावर चर्चा

‘त्या’ नागरिकांच्या जागा उताऱ्यासाठी समस्यांच्या पाढ्यावर चर्चा

चाळीसगाव : शहरातील चौधरीवाडा, जहागीरदारवाडी व शहराच्या अनेक भागात परंपरागत पन्नास वर्षांच्या जुन्या जागांवर नागरिकांचा रहिवास असून, गावठाण जागा असल्याने त्यांना त्या जागेचा उतारा मिळत नाही. परिणामी अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा उतारा मिळण्यासाठी नगर पालिका प्रशासन, महसूल प्रशासन आणि भूमी अभिलेख कार्यालय यांनी मिळून समस्यांवर तोडगा काढावा. नागरिकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड न होता त्यांना उतारा कसा देता येईल? याबाबत कार्यवाही करा व आढावा सादर करा, अशी सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयात ही बैठक संपन्न झाली.

यावेळी खासदार उन्मेश पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस उपस्थित होते.

यावेळी अरुण चौधरी, महारु चौधरी, संतोष चौधरी या नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. या बैठकीला भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्र्वर पाटील ,पालिकेतील गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक मानसिंग राजपूत, नगरसेवक बापू अहिरे, नगर अभियंता विजय पाटील, अव्वल कारकून शैलेश राजपूत, प्रभाकर चौधरी, सदानंद चौधरी, हर्षल चौधरी, बंडू पगार, अनिल गोत्रे, अरुण चौधरी, शुभम पाटील, संजय कापसे, भूमी अभिलेख उपअधीक्षक दीपक साळवे, अरुण शिंपी आदी उपस्थित होते.

खासदार उन्मेश पाटील यांनी शासन निर्णयाच्या अधीन राहून या नागरिकांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी व याबाबत बैठक घेऊन आढावा बैठकीत याबाबतचा तपशिल सादर करा. समस्याग्रस्त सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच घरकुलांबाबत जे सर्वेक्षण झाले आहे, त्याबाबत पालिकेने प्रभावी भूमिका घेत संबंधित एजन्सीचे पेमेंट थांबवा, अशा सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी येथे दिल्या.

यावेळी पालिकेचे नगर अभियंता विजय पाटील, भूमी अभिलेख उपअधीक्षक दीपक साळवे, अव्वल कारकून शैलेंद्र राजपूत यांनी अडचणींबाबत माहिती दिली. उपस्थित नगरसेवकांनी शहरातील विविध भागातील अडचणी मांडल्या. येत्या रविवारी यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवावी, असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Discussion on the issue of displacement of 'those' citizens