म्युकरमायकोसिसच्या चार रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:43+5:302021-06-24T04:13:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी म्युकरमायकोसिस आजारातून बरे झालेल्या ४ रुग्णांना घरी ...

Discharge to four patients with mucomycosis | म्युकरमायकोसिसच्या चार रुग्णांना डिस्चार्ज

म्युकरमायकोसिसच्या चार रुग्णांना डिस्चार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी म्युकरमायकोसिस आजारातून बरे झालेल्या ४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात पारोळा, नंदुरबार, मोरगाव, ता. रावेर आणि कढोली, ता. एरंडोल येथील रुग्णांचा समावेश आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद उपस्थित होते.

पारोळा व नंदुरबार येथील अनुक्रमे ५० व ५८ वर्षीय पुरुषांना या म्युकर मायकोसिस आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होती. त्यांच्या जबड्याची शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचविण्यात यश आले होते. तसेच मोरगाव, ता. रावेर आणि कढोली, ता. एरंडोल येथील अनुक्रमे ४८ व ६२ वर्षीय पुरुषांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण झाली होती. सर्व रुग्ण साधारण १६ ते २७ दिवसांच्या कालावधीत बरे झाले आहे.

Web Title: Discharge to four patients with mucomycosis