दिव्यांग प्राथमिक तपासणी आणि साहित्य वाटप शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:28+5:302021-08-19T04:22:28+5:30

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार किशोर पाटील यांनी अशा प्रकारचे दिव्यांग बांधवांसाठी संपन्न होणारे हे पहिलेच शिबिर असून, पाचोरा तालुक्यात ...

Disability Preliminary Inspection and Material Distribution Camp | दिव्यांग प्राथमिक तपासणी आणि साहित्य वाटप शिबिर

दिव्यांग प्राथमिक तपासणी आणि साहित्य वाटप शिबिर

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार किशोर पाटील यांनी अशा प्रकारचे दिव्यांग बांधवांसाठी संपन्न होणारे हे पहिलेच शिबिर असून, पाचोरा तालुक्यात असलेल्या दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेला हा एक अल्प प्रयत्न असून, केवळ साहित्य वाटप करूनच नव्हे तर दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवता यावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगून दिव्यांगांना मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

पाचोरा व भडगाव मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यक सहायक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत १० लाख रुपये मंजूर केले आहेत.

प्रास्ताविक एस. पी. गणेशकर यांनी केले तर समाजकल्याण अधिकारी अपंग पुनर्वसन भरत चौधरी, मीनाक्षी निकम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील,उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, शरद पाटे, पप्पू राजपूत,स्वीय सहायक राजेश पाटील, वैभव पाटील,राजेंद्र पाटील, अनिल पाटील,सागर पाटील, अनिकेत सूर्यवंशी, उद्धव मराठे, प्रवीण ब्राह्मणे,सुमित पाटील,बापू हटकर,गणेश चौधरी उपस्थित होते.

Web Title: Disability Preliminary Inspection and Material Distribution Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.