एस.टी.पतपेढी भरती प्रकरणी संचालकांची आज चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:13 IST2020-01-16T12:13:08+5:302020-01-16T12:13:35+5:30
जळगाव : जळगाव जिल्हा एस. टी. कर्मचारी सहकारी पतपेढीत नोकर भरतीत भष्ट्राचार केल्या प्रकरणी जळगाव आगारातील कर्मचारी दिलीप सुर्यवंशी ...

एस.टी.पतपेढी भरती प्रकरणी संचालकांची आज चौकशी
जळगाव : जळगाव जिल्हा एस. टी. कर्मचारी सहकारी पतपेढीत नोकर भरतीत भष्ट्राचार केल्या प्रकरणी जळगाव आगारातील कर्मचारी दिलीप सुर्यवंशी यांनी जिल्हा उपनिबंधक व नाशिक येथील जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नाशिक येथील उपनिबंधकांनी पतपेढीचे चेअरमन पंडीत बाविस्कर यांच्यासह इतर संचालकांना चौकशीसाठी बोलाविले आहे.
दरम्यान, एस. टी. कर्मचारी पतपेढीतील नोकर भरती ही, चेअरमन या नात्याने असलेल्या अधिकारावरुन केली आहे. त्या कुठलाही गैरप्रकार नसून, दिलीप सुर्यवंशी यांच्या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचे चेअरमन पंडित बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.