विभागीय युवा नाट्यसाहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी डिगंबर महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:21 IST2018-07-04T18:18:40+5:302018-07-04T18:21:28+5:30
अमळनेरात सप्टेंबरमध्ये होणार संमेलन

विभागीय युवा नाट्यसाहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी डिगंबर महाले
अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (पुणे) अमळनेर शाखेद्वारा आयोजित विभागीय युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर विठ्ठल महाले यांची निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या ‘मसाप’च्या अमळनेर शाखेच्या कार्यकारणीच्या झालेल्या सभेत एकमताने ही निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी केली. या वेळी प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कार्यवाह भाऊसाहेब देशमुख, कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, अध्यक्ष नरेंद्र निकुंभ, उपाध्यक्ष शरद सोनवणे, प्रा.रमेश माने, अविनाश बोरसे, दिलीप सोनवणे, संजय चौधरी,गोकुळ बागुल, प्रकाश सोनवणे, निरंजन पेंढारे, माधुरी पाटील, विजया गायकवाड आदी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
पुणे ‘मसाप’च्या वतीने युवा नाट्य साहित्य संमेलन अमळनेर येथे सप्टेंबर २०१८ मध्ये घेण्यात येणार आहे. अमळनेर येथे ‘मसाप’ शाखेच्या स्थापनेनंतर अल्पावधीत मिळालेल्या या संमेलनरुपी संधीला समस्त साहित्य व संस्कृती प्रिय खान्देशातील व विशेषत: अमळनेरकर नागरिक यांच्या भक्कम समर्थनाच्या बळावर यशस्वी करण्याचा सर्वांनी निर्धार केला. व्यवस्थात्मक बाबींवर सविस्तर चर्चाही करण्यात आली.