शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 

By सुनील पाटील | Updated: May 23, 2024 09:37 IST

पुण्यातील कारचालक अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना आरोपी करण्यात आले. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश यातून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाही मंत्र्याने रामदेववाडीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही.

जळगाव : पुण्यात बिल्डरच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने दोन युवा अभियंत्यांना चिरडल्याच्या घटनेची खुद्द उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पुण्यात येऊन पोलिस यंत्रणेची बैठक घेत घटनेचा आढावा घेतला. तेथे तत्काळ आरोपीला अटक झाली. जळगाव तालुक्यातील रामदेववाडीत मात्र अशाच एका घटनेत चारजणांचा जीव जाऊनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही. आरोपींना अटक तर सोडाच; दिलासा म्हणून कोणतीच मदत या कुटुंबांना अद्याप मिळालेली नाही. पुण्यात वेगळा न्याय आणि रामदेववाडीत वेगळा का? अशा संतप्त भावना गावकऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

पुण्यातील कारचालक अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना आरोपी करण्यात आले. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश यातून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाही मंत्र्याने रामदेववाडीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही.

जळगाव, पारोळ्यात घेतले रक्ताचे नमुने- रामदेववाडीतील घटनेनंतर वाहनातील जखमी तरुणांना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अर्णव अभिषेक कौल याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईला नेले.   - अखिलेश संजय पवार याचे जळगावात रक्ताचे नमुने घेण्यात आले, तर अर्णवला घेऊन जाणारी रुग्णवाहिका पारोळ्यात थांबवून तेथे रक्ताचे नमुने घेण्यात आले. दोघेही मुंबईत उपचार घेत आहेत.

अपघाताचा तपास आता डीवायएसपींकडेअपघात प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक ए. सी. मनोरे यांच्याकडून काढून घेण्यात आला असून, तो डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ‘लोकमत’मध्ये बुधवारी प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तडकाफडकी तपास अधिकारी बदलला. या घटनेत अर्णव अभिषेक कौल हा कार चालवीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती डीवायएसपी संदीप गावित यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू