झाला का रे अभ्यास तुझा... पळ इथून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:10+5:302021-09-16T04:22:10+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. शिक्षण विभागाकडूनही ...

झाला का रे अभ्यास तुझा... पळ इथून...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. शिक्षण विभागाकडूनही परीक्षेसंदर्भात तयारी पूर्ण झाली आहे. आठ केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थीसुद्धा जोमाने अभ्यासाला लागले आहेत. त्यात तरुणांच्या कट्ट्यावर परीक्षेसंदर्भात चर्चा रंगल्या आहेत. झाले असे की, चार ते पाच तरुण कट्ट्यावर अभ्यासाबाबत चर्चा करीत होते. त्यातील एकाने बाबा रे तुझे पेपर सुरू होत आहेत न मग झाला का अभ्यास?... तर दुस-याने सकाळपासून अभ्यासच सुरू होता. आता तर पास होणार, चांगला अभ्यास झाला आहे, असे उत्तर दिले. तेवढ्यात त्या तरुणाच्या वडिलांची एंट्री झाली. झाला का रे अभ्यास तुझा...? नसेल तर पळ इथून असे बोलताच, तो तरुण घराकडे पळाला. त्यानंतर कट्ट्यावरच्या त्या तरुणांनीही तेथून काढता पाय घेतला.
-सागर दुबे