लायन्स क्लबतर्फे १८० जणांची मधुमेह तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:26 IST2019-11-19T21:26:08+5:302019-11-19T21:26:22+5:30
जळगाव : जागतिक मधुमेह दिनानिमित्त लायन्सक्लबतर्फे नवीन बसस्थानकावर मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी १८० जणांची तपासणी ...

लायन्स क्लबतर्फे १८० जणांची मधुमेह तपासणी
जळगाव : जागतिक मधुमेह दिनानिमित्त लायन्सक्लबतर्फे नवीन बसस्थानकावर मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी १८० जणांची तपासणी करण्यात आली़
परिवहन महामंडळाचे प्रबंधक प्रज्ञेश बोरसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ डॉ़ राजेंद्र अग्रवाल यांनी तपासणी केली़ यावेळी लायन्स क्लब जळगावचे अध्यक्ष पन्नालाल वर्मा, सचिव नारायण भारवानी, स्वामी रेणापुरकर, चंपालाल सोनी, प्रशांत चांदीवाल आदी उपस्थित होते़, अशी माहिती अनिता कांकरीया यांनी दिली़ यावेळी मधुमेहाच्या बाबतीत मार्गदर्शनही करण्यात आले़