शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

जळगावात २० टक्क्यांनी वाढले धुलीकरणाचे प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:59 IST

जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही वाढ झाली नाही. मात्र, हवेतील धुलीकरणाच्या प्रदूषणात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे

ठळक मुद्देयंदा कमी फटाके फोडल्यामुळे हवेचे प्रदूषणही झाले कमीउपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले होते नमुणेतीन ठिकाणी मोजण्यात आली ध्वनीची पातळी

सचिन देवजळगाव : जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही वाढ झाली नाही. मात्र, हवेतील धुलीकरणाच्या प्रदूषणात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दरवर्षी दिवाळीच्या काळात हवेची गुणवत्ता तपासण्यात येत असते. यंदादेखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १ ते १४ नोव्हेंबर दरम्यान हाय व्हाल्यूम ईअर मशिनद्वारे दर आठ तासाला वातावरणातील प्रदुषणाचे नमुने जळगावातील गिरणा पाण्याची टाकी व जुन्या बी. जे. मार्केटच्या इमारतीवर घेण्यात आले. हे नमुने दररोज दुसºया दिवशी प्रदूषण मंडळाच्या नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते.महिनाभरानंतर नाशिक प्रयोगशाळेतर्फे प्रदूषणाचा अहवाल जळगाव कार्यालयाला प्राप्त झाला आहे. तसेच नाशिक येथील अश्वमेध या खाजगी संस्थेतर्फेही शहरातील तीन ठिकाणी ध्वनीची पातळी मोजण्यात आली होती. मात्र, अश्वमेध संस्थेचा अहवाल अद्याप आलेला नाही.खराब रस्त्यांमुळे वाढले धुलीकरणाचे प्रमाणधुलीकरणामुळे प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब रस्ते असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले. खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवेत धुळ पसरत असते व त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्याखालोखाल शहरात सुरु असलेल्या बांधकामांमुळेही धुळीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.दिवाळीच्या काळात १५ दिवस हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता मोजण्यात आली. यामध्ये शहरात कमी प्रमाणात फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात कुठलीही वाढ झालेली दिसून आली नाही. मात्र, वातावरण धुलीकरणाचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. तर ध्वनी प्रदूषणाची नोंद नाशिक येथील अश्वमेध संस्थेने घेतली असून,त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.-सोमनाथ कुरमुडे, उपप्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :pollutionप्रदूषणJalgaonजळगाव