धुळवडीच्या रंगाचा बेरंग! आंघोळीसाठी तलावावर गेलेल्या धरणगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू
By चुडामण.बोरसे | Updated: March 25, 2024 18:15 IST2024-03-25T18:14:36+5:302024-03-25T18:15:20+5:30
मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.

धुळवडीच्या रंगाचा बेरंग! आंघोळीसाठी तलावावर गेलेल्या धरणगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू
भगीरथ माळी
धरणगाव (जि.जळगाव) : धुळवड खेळून तलावात आंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील जांभोरा गावाजवळ सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घटना घडली.
जितेंद्र माळी (२०, रा. लोहार गल्ली, धरणगाव ) असे मयत तरुणाचे नाव आहे. सकाळी धुळवड खेळल्यानंतर जितेंद्र हा तीन ते चार मित्रांसोबत जांभोरा येथील तलावावर पोहण्यास गेला होता. परंतु थोड्याच वेळात जितेंद्र बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. साधारण तीन ते चार तासाच्या प्रयत्नानंतर जितेंद्रचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.