धानोरा पोलीस पाटलाने पकडून दिला खुनातील आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:40 IST2019-06-13T16:39:46+5:302019-06-13T16:40:47+5:30

खून करून फरार झालेला आरोपी धानोरा पोलीस पाटील यांच्या सतर्कतेने स्वत: पकडून अडावद पोलिसांच्या ताब्यात दिला.

Dhanora police seize custody and murder accused | धानोरा पोलीस पाटलाने पकडून दिला खुनातील आरोपी

धानोरा पोलीस पाटलाने पकडून दिला खुनातील आरोपी

ठळक मुद्देमागील भांडणाच्या कारणावरून केला होता खूनघटनेनंतर संशयित आरोपी झाला होता फरारगुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून पकडले संशयिताला

धानोरा, ता.चोपडा, जि.जळगाव : खून करून फरार झालेला आरोपी धानोरा पोलीस पाटील यांच्या सतर्कतेने स्वत: पकडून अडावद पोलिसांच्या ताब्यात दिला.
सूत्रांनुसार, ९ जून रोजी रात्री साडेनऊला देवझिरी येथील पिंटू फिरता बारेला याने मागे झालेल्या भांडणाच्या कारणावरून दीपक बजाऱ्या पावरा याच्या गळ्यावर चाकूने वार केले होते. नंतर दीपकचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर दीपक फरार होता.
याबाबत अडावद पोलिसात (भाग पाच, गु.र.नं.४५ /२०१९, भा.दं.वि) कलम ३०२) गुन्हा दाखल आहे.
धानोरा येथील पोलीस पाटील दिनेश चंपालाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित दीपक पावरा याच्यावर पाळत ठेवली. त्यांनी दि.१३ जून रोजी पहाटे साडेपाचला दीपक यास पकडून अडावद पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस पाटील दिनेश पाटील यांना उपविभागीय पोलीस अधिकारी सौरभकुमार अग्रवाल व अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीमुळे दिनेश पाटील यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Web Title: Dhanora police seize custody and murder accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.