धानोरा पोलीस पाटलाने पकडला खुनातील आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:04 IST2019-06-14T15:03:38+5:302019-06-14T15:04:03+5:30

आरोपीस दिले पोलिसांच्या ताब्यात

Dhanora police arrested in Patala murder case | धानोरा पोलीस पाटलाने पकडला खुनातील आरोपी

धानोरा पोलीस पाटलाने पकडला खुनातील आरोपी


धानोरा, ता.चोपडा : खून करून फरार झालेला आरोपी धानोरा पोलीस पाटील यांनी सतर्कतेने स्वत: पकडून अडावद पोलिसांच्या ताब्यात दिला.
सूत्रांनुसार, ९ जून रोजी रात्री साडेनऊला देवझिरी येथील पिंटू किरता बारेला याने पूर्ववैमनस्यातून दीपक बजाऱ्या पावरा याच्या गळ्यावर चाकूने वार केले होते. नंतर दीपकचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर पिंटू फरार होता. याबाबत अडावद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. धानोरा येथील पोलीस पाटील दिनेश चंपालाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित पिंटू बारेला याच्यावर पाळत ठेवली. त्यांनी दि.१३ जून रोजी पहाटे साडेपाचला पिंटू यास पकडून अडावद पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Dhanora police arrested in Patala murder case