सत्यशोधक दिनानिमित्त धरणगावला कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:34 IST2019-09-24T23:34:09+5:302019-09-24T23:34:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धरणगाव : येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई ...

सत्यशोधक दिनानिमित्त धरणगावला कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
व्ही.टी. माळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.के.कापडणे होते. शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. सारिका गायकवाड हिने मनोगत व्यक्त केले. शिक्षक पी.डी.पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एस.व्ही.आढावे यांनी केले तर आभार जे.एस. पवार यांनी मानले.