अमळनेर येथे साखरपुड्यात नाचताना धरणगावच्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 23:47 IST2020-01-12T23:45:27+5:302020-01-12T23:47:27+5:30
साखरपुड्यात नाचताना धरणगाव येथील युवकाचा अमळनेर येथे हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी चारला घडली.

अमळनेर येथे साखरपुड्यात नाचताना धरणगावच्या युवकाचा मृत्यू
धरणगाव, जि.जळगाव : साखरपुड्यात नाचताना धरणगाव येथील युवकाचा अमळनेर येथे हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी चारला घडली. कार्तिक राजू करोसिया (वय २६) असे या युवकाचे नाव आहे.
रामदेव बाबा नगरातील रहिवासी मित्राचा साखरपुडा अमळनेर येथे होता. यासाठी कार्तिक गेलेला होता. डीजेवर नाचत असताना त्याच्या छातीत दुखू लागले. यामुळे तो कुणाला काही न सांगता, मंडपाच्या बाजूला झोपला. साखरपुड्यात सत्कारासाठी त्याचे नाव पुकारले तेव्हा त्यास उठवले. मात्र तो उठला नाही. तेव्हा त्यास दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
करोसिया परिवारासह मित्र परिवाराला अचानक झालेल्या मृत्यूने धक्काच बसला आहे.
आज अंत्ययात्रा
मयत कार्तिक हा धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी राजू करोसिया यांचा लहान चिरंजीव होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक भाऊ लखन, एक बहीण असा परिवार आहे. अंत्ययात्रा दि.१३ रोजी सकाळी ११ वाजता रामदेवजी बाबा नगरातून निघणार आहे.