तीर्थक्षेत्र विकासासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:02+5:302021-05-28T04:14:02+5:30

चाळीसगाव : तालुक्यात तीर्थक्षेत्र विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला ...

For the development of pilgrimage | तीर्थक्षेत्र विकासासाठी

तीर्थक्षेत्र विकासासाठी

चाळीसगाव : तालुक्यात तीर्थक्षेत्र विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित विकासकामांसाठी शासनाकडून विकासाची अपेक्षा आहे, अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

रमेश सोनवणे यांची निवड

फोटो

चाळीसगाव : प्रमिलाबाई पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रमेश जगन्नाथ सोनवणे यांची महात्मा फुले ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय किसनराव चांबारगे यांनी केली आहे. त्यांच्या सहीचे नियुक्तीपत्र सोनवणे यांना प्राप्त झाले आहे.

दारू विक्रेत्यावर कारवाई

अमळनेर : खापरखेडा ता. अमळनेर येथील गावठी दारू विक्रेत्यावर मारवड पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले आहे. पंकज उर्फ विलास वसंत भिल (मोरे) हा गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करीत असताना आढळून आला. त्याला अटक करण्यात आली.

Web Title: For the development of pilgrimage