शंभर वृक्ष जगविण्याचा केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST2021-08-25T04:20:56+5:302021-08-25T04:20:56+5:30

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व सह्याद्री देवराई सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील भराडी येथे ...

Determined to keep a hundred trees alive | शंभर वृक्ष जगविण्याचा केला संकल्प

शंभर वृक्ष जगविण्याचा केला संकल्प

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व सह्याद्री देवराई सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील भराडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

हजार झाडे लावण्यापेक्षा १०० झाडे लावून त्यांची पूर्णपणे हमी घेत वृक्ष संवर्धनाचा ध्यास घेतला. यामार्फत झाडे मोठे होईपर्यंत त्यांची जबाबदारी भराडी येथील ग्रामपंचायतीने स्वीकारत नवा आदर्श निर्माण केला आहे.

या कार्यक्रमाला सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य. अध्यक्ष बाबासाहेब पावसे तसेच सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजीराव शिंदे यांनी ऑनलाईन स्वरूपात शुभेच्छा दिल्या.

तसेच भराडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड.ग.वि. अधिकारी कवडदेवी, जि.प. सदस्या प्रमिला पाटील प्रदीप लोढा डॉ. प्रशांत पाटील. शाम सावळे, दत्ता साबळे, गोंडू मोगरे, विवेक जाधव, नाना पाटील, सत्यवान पाटील, तसेच सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक, सरपंच, गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी वृक्षारोपण केले. २५/६

Web Title: Determined to keep a hundred trees alive