शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

खंडणी प्रकरणात तिसरा आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST

भुसावळ: अश्लील क्लीप महिलेला पाठविल्यानंतर त्या बदल्यात तडजोडीपोटी पाच लाख रुपये न दिल्याने व्यापाऱ्यास मारहाण करीत बळजबरीने नोटरीद्वारे ...

भुसावळ: अश्लील क्लीप महिलेला पाठविल्यानंतर त्या बदल्यात तडजोडीपोटी पाच लाख रुपये न दिल्याने व्यापाऱ्यास मारहाण करीत बळजबरीने नोटरीद्वारे १८ लाख रुपये किमतीची कार बळकविण्यात आल्याची घटना शहरातील वरणगाव रोडवरील हॉटेल सायलीजवळ २९ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील सात आरोपींपैकी दोघांना अगोदरच अटक करण्यात आली तर सोमवारी आणखी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी अजय गिरधारी गोडाले (वय ३०, रा. साकरी फाटा) हा आहे. आहे. व्यापारी नीलेश दिगंबर चौधरी (वय ४८, श्रीनगर, लोणारी हॉलजवळ, भुसावळ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. यानुसार लीना तल्लारे व अजय गोडाले तसेच अन्य काहींनी अश्लील क्लीपच्या तडजोडीपोटी पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी पचेरवाल याने फिर्यादीस मारहाण करीत जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तल्लारे यांनी नोटरी करणाऱ्या वकिलाला बोलावत जबरदस्तीने १८ लाखांची टाटा हॅरीयर गाडी (एम.एच.१९ सी.व्ही.६४८७) ही तल्लारे यांना विक्री केल्याचे कागदपत्रे बनवत गाडी जबरदस्तीने घेऊन गेले होते. या प्रकरणी लीना तल्लारेसह सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, रवींद्र बिऱ्हाडे, रमन सुरळकर, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश माळी, जीवन कापडे, परेश बिऱ्हाडे आदींच्या पथकाने कारवाई केली.