तोतया टीसीला भुसावळात अटक

By Admin | Updated: May 10, 2017 11:43 IST2017-05-10T11:43:28+5:302017-05-10T11:43:28+5:30

वाराणसी एक्स्प्रेसमधील प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करुन त्यांच्याकडून पैसे उकळणारा तोतया टीसी आशिष प्रकाश यादव रा.जाैनपूर, उ.प्र.यास भुसावळ येथे अटक करीत लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Detective Tissil arrested in Bhusaval | तोतया टीसीला भुसावळात अटक

तोतया टीसीला भुसावळात अटक

 भुसावळ,दि.10 - 22167 एलटीटी- वाराणसी एक्स्प्रेसमधील प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करुन त्यांच्याकडून पैसे उकळणारा तोतया टीसी आशिष प्रकाश यादव रा.जाैनपूर, उ.प्र.यास भुसावळ येथे अटक करीत लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 आशिष यादव हा एलटीटी-वाराणसी एक्प्रेसमधील प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करुन पैसे उकळत होता. मागे तिकिट तपासणी पथक आहे. ते जास्त पैसे घेतील. तुम्ही कमी द्या ,असे सांगून लुबाडत होता. दरम्यान, याच गाडीत मुख्य तिकिट तपासणीस अख्तर खान, अनिल खर्चे व स्केल (काटेवाला) पोर्टर अनंता कनोज यांचे पथक तिकिट तपासणी करीत होते. त्यांना प्रवाशांनी सांगितले आमच्याकडील तिकिटाची तपासणी आधीच झाली.त्यामुळे खान, खर्चे यांनी मनमाड आरपीएफच्या सहाय्याने यादव यास मनमाड येथे अटक केली. त्याच्याकडून 1 हजार 950 रुपजे जप्त करण्यात आले. ही कारवाई डीआरए आर.के.यादव, सिनिअर डीसीएम सुनील मिश्रा, एसीएम (तिकिट चेकींग) अजयकुमार यादव, विभागीय तिकिट तपाणी निरीक्षक बी. एस. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Detective Tissil arrested in Bhusaval