नशिराबादला वीज तारांची ठिणगीने ४० हजाराचा चारा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 08:37 PM2021-03-02T20:37:55+5:302021-03-02T20:38:20+5:30

नशिराबाद: येथील वीज वितरण कंपनीनेच्या सबस्टेशनच्या जवळच लोबकणाऱ्या वीज तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने वीजेची ठिणगी पडली. त्यामुळे संजय रमेश ...

Destroy 40,000 fodder to Nasirabad with electricity wires | नशिराबादला वीज तारांची ठिणगीने ४० हजाराचा चारा खाक

नशिराबादला वीज तारांची ठिणगीने ४० हजाराचा चारा खाक

Next


नशिराबाद: येथील वीज वितरण कंपनीनेच्या सबस्टेशनच्या जवळच लोबकणाऱ्या वीज तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने वीजेची ठिणगी पडली. त्यामुळे संजय रमेश मेहता यांच्या शेतात पाच एकर चारा पैकी दोन एकर चारा जळून खाक झाला आहे. सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ही घटना मंगळवारी घडली भादली रोडवर गावाच्या लगत शेत असल्यामुळे लागलीच नागरिकांनी विझवण्यासाठी प्रयत्न केले.याप्रसंगी ललित महाजन संजय नेते मनोज पाटील शेखर पाटील जितेंद्र पाटील कपिल पाटील आदींनी सहकार्य केले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. शेतात गेले दोन दिवसापूर्वी धान्याची मळणी झाली होती चाऱ्याच्या पिंट्या भांडण यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई त्वरित मिळावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे तलाठी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Web Title: Destroy 40,000 fodder to Nasirabad with electricity wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.