पावसाळा येऊनही धरणगावात नालेसफाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST2021-07-02T04:11:59+5:302021-07-02T04:11:59+5:30
शहरातील नाल्यांची नियमित सफाई होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात नाल्यांना पूर येऊ शकतो. या नाल्यामध्ये पाणी साचून एखाद्याचा जीव ...

पावसाळा येऊनही धरणगावात नालेसफाई नाही
शहरातील नाल्यांची नियमित सफाई होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात नाल्यांना पूर येऊ शकतो. या नाल्यामध्ये पाणी साचून एखाद्याचा जीव जाण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही वर्षात शहराची लोकसंख्या वाढली आहे. परंतु, त्या तुलनेत शहरातील सांडपाण्याची व्यवस्थान अजूनही सुरळीत नाहीय. छोट्या गटारी पावसात तुडुंब भरून रस्त्यावरून वाहतात. नवीन भागासाठी तर नगर परिषदेकडून कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाहीय. सांडपाण्यासह रानातून येणारे पाणी धरणी नाल्यातून वाहत असते. परंतु या प्रमुख नाल्याची पावसाळ्यापूर्वी सफाई झालेली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणी परिसरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.
शहरातील इतर लहान-मोठ्या नाल्यांच्या सफाई नगर परिषदेकडून नियमित केली जात नाहीच. त्यामुळे वर्षातून एकदा या नालेसफाईला पावसाळ्यापूर्वी मुहूर्त मिळतो. यंदा पावसाळा सुरू झालाय तरीदेखील नगर परिषदेला नालेसफाईसाठी अजूनही जाग आलेली दिसत नाही. दुसरीकडे नगरसेवकदेखील सध्या प्रभागात दिसेनासे झाले आहेत.
लॉकाडाऊनच्या नावाखाली अनेकजण नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास टाळताय.
गेल्या वर्षभरात चारवेळेस नालेसफाई केली असून त्याठिकाणी रहिवासी वारंवार पद्धतीने त्यात कचरा टाकत असतात. नगर परिषदेतर्फे विनंती आहे की, आपल्या घरासमोर घंटागाडी येते, त्यात आपण कचरा टाकावा.
जनार्दन पवार,
मुख्याधिकारी, धरणगाव
पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी धरणी नाल्याची सफाई झालेली नाही. मुसळधार पावसामुळे काही घाण वाहून गेली, पण काही घाण नाल्यात तशीच आहे. त्यामुळे धरणी परिसरात दुर्गंधी येते व नागरिकांना त्रास होतो.
-विकास लांबोळे,
सरचिटणीस, धरणगाव शहर काँग्रेस.
धरणगाव नगर परिषदेला वारंवार निवेदन देत नालेसफाईसंदर्भात सांगितले असता लक्ष दिले नाही. या किरकोळ कामासाठीसुद्धा आम्ही विरोधात असून आंदोलने करायचे का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
-ललित येवले, भाजप
नगरसेवक, धरणगाव
010721\01jal_1_01072021_12.jpg
पावसाळा येऊनही धरणगावात नालेसफाई नाही