ऑक्सिजन पातळी ७७ वर येऊनही प्राध्यापकाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST2021-05-20T04:17:42+5:302021-05-20T04:17:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ऑक्सिजनची पातळी ७७ च्या खाली अशा गंभीर अवस्थेत कोरोनावर मात करून संजय मोरे या ...

Despite the oxygen level reaching 77, the professor overcame the corona | ऑक्सिजन पातळी ७७ वर येऊनही प्राध्यापकाची कोरोनावर मात

ऑक्सिजन पातळी ७७ वर येऊनही प्राध्यापकाची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ऑक्सिजनची पातळी ७७ च्या खाली अशा गंभीर अवस्थेत कोरोनावर मात करून संजय मोरे या प्राध्यापकाने सकारात्मक विचार व योग्य उपचार यांच्या जोरावर कोरोनावर विजय मिळविला.

सर्व शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे ३१ मार्च रोजी कुटुंबासह औरंगाबाद येथे लग्न सोहळ्याला गेले होते. लग्न आटोपून घरी येत असताना, त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. रात्रीच त्यांची तपासणी करण्यात आली व त्यांना उपचारार्थ दाखल करण्‍यात आले. तसेच पत्नी व मुला, मुलीसही उपचारार्थ दाखल करण्‍यात आले. उपचार सुरू असताना १२ एप्रिल रोजी प्रा. मोरे यांची ऑक्सिजन पातळी ही ७७ च्या खाली पोहोचली. प्रकृती बिघडल्यामुळे नातेवाईकांनासुध्दा रुग्णालयात बोलावून घेतले. १३ एप्रिलला त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर शेवटी १४ एप्रिलला रोजी सकारात्मक विचार आणि योग्य उपचारामुळे प्रा. मोरे यांनी कोरोनावर मात केली आणि सुखरूप घरी परतले.

Web Title: Despite the oxygen level reaching 77, the professor overcame the corona