पतसंस्थांमधील ठेवी परत मिळाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST2020-12-13T04:31:53+5:302020-12-13T04:31:53+5:30

जळगाव : एकनाथराव खडसे ग्रामीण पतसंस्था, लोककल्याण ग्रामीण पतसंस्था, महात्मा फुले अर्बन को.ऑप सोसायटी, धनवर्धिनी या संस्थेमधील ठेवी ...

Deposits in credit unions should be returned | पतसंस्थांमधील ठेवी परत मिळाव्या

पतसंस्थांमधील ठेवी परत मिळाव्या

जळगाव : एकनाथराव खडसे ग्रामीण पतसंस्था, लोककल्याण ग्रामीण पतसंस्था, महात्मा फुले अर्बन को.ऑप सोसायटी, धनवर्धिनी या संस्थेमधील ठेवी तात्काळ परत मिळाव्यात तसेच संबंधित पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत ठेवीदारांसह माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

बीएचआर संस्थेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता इतरही सहकारी संस्थांचे ठेवीदार पुढे येऊ लागले आहेत. यामध्ये भुसावळ येथील एकनाथराव खडसे ग्रामीण पतसंस्था, लोककल्याण ग्रामीण पतसंस्था, महात्मा फुले अर्बन को.ऑप सोसायटी, धनवर्धिनी संस्थेच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन पतसंस्थांविरुद्ध तक्रार करण्यात आली.

या मध्ये वरील संस्थांमध्ये असलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यादव जगन्नाथ पाटील प्राजक्ता पाटील, प्रथमेश पाटील, ज्ञानदेव भंगाळे ( सर्व रा. तळवेल, ता. भुसावळ), आशाबाई प्रकाश चौधरी, रा. वरणगाव, ता. भुसावळ यांनी तक्रारी दिल्या आहेत.

Web Title: Deposits in credit unions should be returned