विवरे बुद्रूक येथे आढळला डेंग्यूचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:52 IST2018-12-26T21:50:39+5:302018-12-26T21:52:20+5:30

रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक येथे एका २३ वर्षांच्या मुलाला डेंग्यूची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे

Dengue sufferers found at Vivere Budruk | विवरे बुद्रूक येथे आढळला डेंग्यूचा रुग्ण

विवरे बुद्रूक येथे आढळला डेंग्यूचा रुग्ण

ठळक मुद्दे२३ वर्षाच्या मुलाला झाली लागणसावदा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरुसाफसफाईअभावी तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

विवरे, ता.रावेर : रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक येथे एका २३ वर्षांच्या मुलाला डेंग्यूची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
या मुलास सावदा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
विवरे येथील वघाडी नाल्याच्या सफाईचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. या नाल्यात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. वारंवार सफाईची मागणी करूनदेखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
वघाडी नाल्यात बऱ्याच दिवसांपासून साफसफाई झालेली नाही. या नाल्याच्या किनाºयावर व घराच्या पाठीमागे कचºयाचा ढिग पडलेला आहे. यातूनच डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे तामाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे.

Web Title: Dengue sufferers found at Vivere Budruk