१०० रुपयाला एकच ड्रॅगन फ्रुट
ड्रॅगन फ्रूट १०० ते २०० रुपये नग याप्रमाणे मिळते तर किवीचा एक लहान बॉक्स ज्यामध्ये तीन ते ४ फळे असतात, तो १०० रुपयाला मिळतो.
फळांचे दर (प्रतिकिलो)
मोसंबी ४०-६०
चिकू ४०-६०
पपई २००-३०
डाळिंब ३० -८०
सफरचंद ८०- १५०
अनसपती ८०-१२०
आवक वाढल्याने सफरचंद आवाक्यात
सफरचंदाचे प्रतिकिलोचे दर ८० ते १२० रुपयांपर्यंत आहेत. सध्या सफरचंदाचा बहर सुरू झाल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे दरही सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. जळगाव रोड, जामनेर रोड, यावल रोडपासून वसंत टॉकीज चौक भागात तसेच बाजारपेठेत मोसंबी विक्रीचे व्यापारी बरेच दिसून येत आहेत.
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
डेंग्यू व चिकुन गुन्याच्या तापात 'अ' व 'क' जीवनसत्त्वे असलेल्या कोणत्याही फळांचा एकूण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने उपयोग होऊ शकतो, असा सल्ला दिला जातो. 'अ' व 'क' जीवनसत्त्वे असलेल्या फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲँटिऑक्सिडंट्स असतात.
काही दिवसांपासून शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने नागरिक ड्रॅगन फ्रुट, किवी, पपई या फळांची खरेदी अधिक करीत आहेत, तर उपवासामुळे चिकू, केळी, सफरचंद, संत्रा, मोसंबीलादेखील मागणी आहे.
- फरदिन बागवान, फळविक्रेते
भारतातही उत्पादन होऊ लागले ड्रॅगन
ड्रॅगन फ्रुट हे थायलँड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंकेत लोकप्रिय आहे. आपल्याकडे हे फळ महाग मिळत असल्याने भारतातही याची शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे. कमी पावसाचे क्षेत्र या फळाच्या पिकासाठी उपयुक्त आहे. या फळापासून जॅम, आईस्क्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्यप्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणून याचा वापर केला जातो. हे शरीरासाठीही लाभदायक आहे.
ड्रॅगन फ्रुट वापी (गुजरात) तसेच मुंबई येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. तेथूनच जळगाव भुसावळ व तालुक्यातील इतर ठिकाणी याची विक्री केली जाते. हे फळ पांढरे, लाल, पिवळ्या या रंगांमध्ये येते.