डेंग्यूचा डंख.... वाढदिवसाच्या चौथ्याच दिवशी बालिकेवर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:29 IST2020-01-04T12:28:59+5:302020-01-04T12:29:45+5:30
बोदवड येथील नगरसेविकाच्याच नातीचा डेंग्यूमुळे मृत्यू

डेंग्यूचा डंख.... वाढदिवसाच्या चौथ्याच दिवशी बालिकेवर काळाची झडप
बोदवड, जि. जळगाव : डेंग्यूने जिल्ह्यात पुन्हा एकदा डोके वर काढले असून जिल्ह्यातील बोदवड येथील नगरसेविका सुशिलाबाई गंगतिरे यांची चार वर्षीय नात श्रावणी दिलीप गंगतिरे या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे १ जानेवारी रोजीच या बालिकेचा वाढदिवस झाला होता. त्यानंतर चौथ्याच दिवशी या बालिकेवर काळाने झडप घातली.
या बालिकेवर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते.