नागेश्वर पुलाजवळील खड्डे दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST2021-07-03T04:12:02+5:302021-07-03T04:12:02+5:30
वरणगाव, ता. भुसावळ : येथील बोदवड रस्त्यावरील नागेश्वर पुलाखाली मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये वाहनधारकांची वाहने अडकून ...

नागेश्वर पुलाजवळील खड्डे दुरुस्तीची मागणी
वरणगाव, ता. भुसावळ : येथील बोदवड रस्त्यावरील नागेश्वर पुलाखाली मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये वाहनधारकांची वाहने अडकून अपघात होत आहेत. संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
वरणगावकडून बोदवडकडे जा-ये करणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. या रस्त्यावर रस्ता नादुरुस्तीमुळे छोटेमोठे अपघात होत असतात. तशातच नागेश्वर पुलाजवळ मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एका मोटारसायकलस्वाराचा तोल जाऊन अपघातापासून ती व्यक्ती बालंबाल बचावली आहे. तरी संबंधित विभागाने अशा वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.