नगर परिषदेसाठी नगरसेवक संख्या वाढवून मिळण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:16+5:302021-08-19T04:22:16+5:30
नशिराबाद : ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगर परिषदेची घोषणा झाली असून, आजच्या लोकसंख्येनुसार येथे १७ सदस्यांऐवजी जास्त नगरसेवक वाढवून मिळावे, ...

नगर परिषदेसाठी नगरसेवक संख्या वाढवून मिळण्याची मागणी
नशिराबाद : ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगर परिषदेची घोषणा झाली असून, आजच्या लोकसंख्येनुसार येथे १७ सदस्यांऐवजी जास्त नगरसेवक वाढवून मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगरसेवकांच्या संख्येसाठी २०११ ची जनगणना गृहीत धरून १७ नगरसेवक असतील असे सांगितले जात आहे. नशिराबादची लोकसंख्या २६ हजार अशी दाखवण्यात आली आहे. मात्र गावात सुमारे पंचवीस हजारांच्या वर मतदार संख्या आहे. २०११ या वर्षाची जनगणना गृहीत धरणे उचित होणार नाही. त्याकरिता आजची लोकसंख्या गृहीत धरून त्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, राजेंद्र पाचपांडे, सुदाम धोबी, दीपक सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.