जीएसटी माफ करीत औषधी स्वस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:15 IST2021-04-11T04:15:44+5:302021-04-11T04:15:44+5:30
संघटनेने केला ठराव : केमिस्ट असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र जळगाव : कोरोनासह इतरही आजारांवर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत असून ...

जीएसटी माफ करीत औषधी स्वस्त करण्याची मागणी
संघटनेने केला ठराव : केमिस्ट असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र
जळगाव : कोरोनासह इतरही आजारांवर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत असून हा खर्च कमी करण्यासाठी औषधींवरील जीएसटी माफ करावा, अशी मागणी डिस्ट्रिक्ट मेडिसीन डीलर असोसिएशनने केली आहे. या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले असून औषधी स्वस्त करण्याविषयीचा ठरावदेखील संंघटनेने केला आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून यावरील उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. त्यात गेल्या वर्षापासून लॉकडाऊनच असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात आता पुन्हा कोरोनासह मधुमेह, हृदयविकार व इतर गंभीर आजारांवर जनतेचा ३० ते ४० टक्के खर्च होत आहे. यातून त्यांना दिलासा मिळण्यासाठी औषधींवर असलेला १२ ते १८ टक्के जीएसटी शून्य टक्के करून औषधी स्वस्त करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर यांनी केली आहे. तसा ठरावच करण्यात आला असून सामाजिक बांधिलकी म्हणून राज्यभरात या विषयी माहिती देऊन औषधी स्वस्त होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सुनील भंगाळे यांनी सांगितले.